जळगाव येथील पाचोरा तालुक्यात पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यावर जबर मारणार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील मारहाण करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यवस्थेवर टीका केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केल्यामुळे पत्रकार संदीप महाजन यांना ही मारहाण करण्यात आली आहे. या सर्व घटनेमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिलीये का नाही हा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत कटारे व जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली.
यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सचिव रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे, खजिनदार विकास कस्तुरे, सहसचिव शहानवाज शेख, इमरान सगरी, विक्रम इंगळे, मनोज भालेराव यांची उपस्थिती होती.