सोलापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात जिल्हा परिषदेच्या वतीने एक तास स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही सहभाग नोंदवला त्यामुळे सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला स्वच्छता करत सर्वजण जिल्हा परिषदेमध्ये आले तेव्हा एक दिव्यांग बांधव त्या ठिकाणी होता.
या ठिकाणी एक ग्रुप फोटो काढण्यासाठी सर्वजण थांबले होते. त्या फोटोमध्ये येण्यासाठी ते दिव्यांग बांधव आपले वाहन सोडून आले आणि सर्वांच्या समोर बसले. हे लक्षात येताच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने “अरे त्यांना खुर्ची मागवा” अशा सूचना केल्या. लगेच कर्मचाऱ्यांनी एक खुर्ची आणली आणि त्यावर ते दिव्यांग जाधव बसले. नंतर फोटोसेशन झाले. यावरून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या माणुसकीची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली.