Tuesday, July 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यासाठी तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज..! प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 September 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ग्रंथालय असल्यामुळे या ठिकाणी ग्रंथालय चळवळ उभा राहिली परंतु ग्रंथालय चळवळ आणखीन पुढे नेण्यासाठी तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची खरी गरज असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी यशदा अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने यशदा अभ्यासिकेचे उद्घाटन प्रसंगी रस्तोगी हे उदघाटक म्हणून बोलत होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार तर ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर प्रमुख उपस्थित होते. 

पुढे बोलताना प्रधान सचिव रस्तोगी म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याकडे रवाना होतात. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाप्रमाणे अभ्यासिका तालुका पातळीवर आणि गावागावात निर्माण झाल्यास निश्चितपणे ग्रंथालय चळवळी याला सुद्धा वेग येईल. नुसती सभासद संख्या आणि पुस्तक संख्या मोठी असेल तर ते ग्रंथालय मोठे मी मानत नाही कारण ग्रंथालय ही एक चळवळ असून त्या ठिकाणी असणारा वाचक वर्ग आणि ग्रंथालयाने वाचकाला वाचन चळवळ उभी राहण्यासाठी दिलेली प्रेरणा यातूनच ग्रंथालय चळवळ जोमाने उभा राहील. 

शासनाची मदत शंभर टक्के मिळाली तरी ग्रंथालय चळवळ राहणार नाही तर ती शासकीय ग्रंथालय होतील. आपल्याला ग्रंथालय ही चळवळच म्हणून कार्यरत राहिली पाहिजे त्यासाठी अशा अभ्यासिका गावागावात निर्माण करून नवीन पिढीच्या हातात पुस्तक दिले पाहिजे. 


यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.  गजानन कोटेवार म्हणाले,  ग्रंथालय चळवळ जोमाने उभी करण्यासाठी 288 आमदारांना या चळवळीचे महत्त्व पटवून देणार असून त्यासाठी बैठा सत्याग्रह उभा करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं. प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी वाचनालय जोमाने वाढवण्यासाठी अनुदान वेळेवर मिळण्यासाठी सकारात्मक काम करावं व वर्धा या ठिकाणी येण्याचं आमंत्रण त्यांनी दिलं. 


राज्य ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर म्हणाले की, शहराकडे जाणारा विद्यार्थ्यांचा ओघ थांबवण्यासाठी अशा प्रकारच्या अभ्यासिका तालुका पातळीवर आणि गावागावात निर्माण होण्याची खरी गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.  डिजिटल क्रांतीमुळे म्हणजेच अलीकडच्या काळामध्ये वाचक संख्या कमी होऊ लागलेली असल्यामुळे ग्रंथालय चळवळीला नवनवीन कौशल्य दाखवून चळवळ पुढे न्यावे लागणार आहे त्यासाठी चांगले काम करण्याची गरज असल्याचे शेवटी बोलताना क्षीरसागर यांनी सांगितले. 


याप्रसंगी ग्रंथमित्र कुंडलिक मोरे व हरिदास रणदिवे यांनी आपले विचार व्यक्त केले. दरम्यान सिंहगड कॉलेजचे प्राचार्य शंकर नवले, काशिनाथ भतगुणकी, शरद सलगर व चवरे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सहाय्यक संचालक शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, ग्रंथमित्र राम मेकाले, जयंत आराध्ये, गुलाबराव पाटील, श्रीकांत येळेगावकर, जिल्हाध्यक्ष विजयकुमार पवार, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, कार्यवाह साहेबराव शिंदे, दत्ता मोरे, अड. संगीता कुमठेकर, प्रकाश शिंदे, संजय सुर्यवंशी, प्रमोद पाटील, प्रदिप गाडे, सोपान पवार, भास्कर कुंभार, विनोद गायकवाड, वृशाली हजारे, सारीक मोरे, सारीका माडीकर, दिपाली नरखेडकर, गीतांजली गंभीरे, नंदा कुर्ले, राजश्री माशाळकर यांच्यासह ग्रंथालय चालक, सेवक वर्ग व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                             

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार यांनी  तर आभार प्रदर्शन कार्यवाह साहेबराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब चटे यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष पदी डॉ किरण देशमुख ; शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची जंबो कार्यकारिणी

Next Post

“मॅडम तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यात या” जिल्हा परिषदेच्या अभियंता पुरस्कारात सीईओ आव्हाळे यांच्या चेहऱ्यावरील हावभाव असे आले समोर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"मॅडम तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर जिल्ह्यात या" जिल्हा परिषदेच्या अभियंता पुरस्कारात सीईओ आव्हाळे यांच्या चेहऱ्यावरील हावभाव असे आले समोर

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

30 June 2025
माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

30 June 2025
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

30 June 2025
आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

30 June 2025
होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

29 June 2025
गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

29 June 2025
श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

28 June 2025

क्राईम

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

by प्रशांत कटारे
30 June 2025
0

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1791589
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group