महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने दिनांक 27. 9 .2023 रोजी जिल्हा परिषदेमधील महाराष्ट्र विकास सेवेतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचे पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेतील नरेगा गटविकास अधिकारी रंजना कांबळे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व पंचायत समिती उत्तर सोलापूरचे सहाय्यक गटविकास अधिकारी उमेश कुलकर्णी यांची अधिव्याख्याता मांजरी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र पुणे येथे वर्ग एक पदी पदोन्नती मिळाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते शाल, फेटा व रोप देऊन सन्मानित करून निरोप देण्यात आले. दोन्हीही अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 कर्मचाऱ्यांमधून पदोन्नती झाल्याने युनियनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशादीन शेळकंदे उपस्थित होते.
प्रास्ताविक राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी केले. याप्रसंगी युनियनचे डॉ. एस पी माने, श्रीशैल देशमुख, विलास मसलकर, संतोष शिंदे, राकेश सोडी, जहीर शेख, सादिक शेख, रणजीत गव्हाणे, गणेश साळुंखे, संतोष गोरे आदी उपस्थित होते. मनीषा आव्हाळे यांनी त्यांच्या पुढील कारकीर्द शुभेच्छा व पदोन्नती बद्दल अभिनंदन केले.