सोलापूर : ०१ अॉगस्ट रोजी प्रती वर्षी प्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा दिवस मोठा गाजावाजा करून महसूल दिन म्हणून साजरा केला जातो, ह्यावर्षी देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल सप्ताहाचे आणि त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनास प्रती दिन कर स्वरूपात कोट्यावधी रुपयांचे महसूल मिळुन देणार्या सोलापूरातील दुय्यम निबंधक कार्यालयात सामान्य जनतेचा अपमान होत असल्याचे सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद ह्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
सदर कार्यालयात येण्यासाठी सामान्य जनतेला कायमस्वरूपी कुलुपबंद निमुळत्या दरवाज्यातुन यावे लागते, हे कमी म्हणून की काय तर कार्यालयात येण्याच्या वाटेत कायमस्वरूपी चिखलातून पायपीट करत यावे लागते, पाऊसाळ्यात तर हा सर्वसामान्यांसाठी रस्ता जिवघेणा होत असल्याची तक्रारपर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर विकास मंचच्या वतीने देण्यात आली.
सदर प्रकारा विषयी सोलापूरकरांनी दुय्यम निबंधक कार्यालयास वारंवार अवगत करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ह्या सगळ्या असुविधां मुळे सोलापूरकरांच्या संयमाचा फुटला बांध फुटला. सोलापूरातील दुय्यम निबंधक कार्यालय आवारील दरवाजा उघडावा आणि सामान्य जनतेला सुखकर होईल असे इतर महत्त्वपूर्ण डागडुजीची कामे तात्काळ करावीत अन्यथा येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जर ह्यावर काही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची इशारा ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्यांनी देऊन ह्या जिव्हाळ्याच्या विषयावर जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर संपूर्ण परिसराचे कॉक्रेटिकरण करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उत्तर सोलापूरचे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, मुद्रांक जिल्हाधिकारी जी.डी.गिते ह्यांच्याकडे सदस्यांनी केली. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले, विजय कुंदन जाधव, गणेश शिलेदार, गणेश पेनगोंडा, वेकअप सोलापूर फौंडेशनचे, गिरिकर्णिका फाऊंडेशनचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.