ऑल इंडिया मजलिस इत्तेहाद्दुल मुस्लमीन पार्टीचे सोलापूर जिल्हा व शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली दौला कुमठे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दौला कुमठे हे मागील काही दिवसांपासून एम आयएम पासून दूर दिसून आले. काय दिवसांपूर्वी सलीम पामा आणि दौला कुमठे हे दोन्ही नेते काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यक्रमात दिसून आले तसेच त्यांनी आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत फोटो सेशन केले होते. त्यामुळे दौला कुमठे हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली.
यावेळी जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद, माजी नगरसेवक गाझी जहागीरदार, माजी नगरसेवक अझहर हुंडेकरी, माजी नगरसेविका वाहेदा भंडाले, रजिया शेख, युवाध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर, इसामोद्दीन पिरजादे, महीबुबअली कुरेशी, शोहेब चौधरी, अब्दुरहेमान मोहोळकर, इम्रान पठान, इम्रान हवालदार, अझहर कोरबू, शजर सय्यद, याकुब MR, सत्तार शेख, अझहर शेख, अझहर जहागीरदार, मुन्ना शेख,अशफाख शेख, जहीर सय्यद ,असिफ जमादार, सचिन कोलते, मचिद्र लोकेकेर, मुश्ताक कानकुर्ती, जुबेर शेख, जुबेर सय्यद, वसिम तलवार, मुसा सेख, बाबा शेख व पक्षातील सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.