जुबेर बागवान व्यापारी मतदारसंघातून प्रमुख दावेदार ; हे आहेत प्लस प्वाईंट
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे. अनेक इच्छुकांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीचे चित्र स्पष्ट व्हायला अजून दहा दिवस बाकी आहेत. दरम्यान व्यापारी प्रतिनिधी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे. ते यंदा प्रबळ दावेदार असून त्याला कारणे ही तशीच आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून 11, ग्रामपंचायत 04, 02 व्यापारी प्रतिनिधी तर 01 हमाल तोलार प्रतिनिधी असे 18 संचालक निवडून दिले जातात. व्यापाऱ्यातून यावेळी राणी लक्ष्मीबाई मंडई मधून एकूण 14 उमेदवार आहेत. त्यापैकी जुबेर बागवान यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती आहे.
जुबेर बागवान हे मागील अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात कार्यरत आहेत. सोलापुरातील त्यांचे कट्टर समर्थक मानले जातात. युवक अध्यक्ष तसेच आता शहर कार्याध्यक्ष पदावर आहेत. मार्केट यार्डात व्यापाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये लॉकडाऊन लागलेला असताना मार्केट यार्डातील माथाडी कामगारांना तत्कालीन पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांना विनंती करून प्रत्येक कामगाराला 3000 हजार रुपये त्यांनी मिळवून दिले होते.
व्यापारी व अडते यांच्या समस्यासाठी धावून येणारा व वेळ देणारा युवा चेहरा म्हणून जुबेर बागवान यांचा विचार होऊ शकतो. व्यापाऱ्यांमध्ये संचालक पदासाठी राजकारण होत नाही.व्यापारी संघटना जे ठरवतील तो संचालक होतो. जर राजकीय समीकरणांचा विचार झाला आणि सेक्युलर चेहरा बघितलं तर जुबेर बागवान हे परफेक्ट मॅच होतात.कस्तुरबा मार्केटचे व्यापाऱ्यां मध्ये राणीलक्ष्मीबाई मार्केटचे 14 इच्छुक उमेदवार पैकी युवा चेहरा म्हणून जुबेर बागवान यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.