जिल्हा परिषदेच्या चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत खरेदी केलेल्या १६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण
जिल्हा परिषदेकडे 14 वा वित्त आयोग (1एप्रिल 15 ते 31 मार्च 2020 ) अंतर्गत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थचे बळकटीकरणासाठी प्राप्त निधी वितरीत केले नंतर सदर व्याज पोटी शिल्लक रक्कमेतून ग्राम विकासाच्या आराखड्यानुसार पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण व उपजिविका या शिर्षकाखाली रुग्णवाहिका (अॅम्बुलन्स) बाबत जि.प. सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली होती
जिल्हयामध्ये 16 प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी । प्रमाणे एकूण 16 रूग्णवाहीका ग्रामपंचायत विभागाकडून खरेदी करून आरोग्य विभागास हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय सोलापूर या नूतन इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा त्यावेळी जि.प. कडोल १६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण पार पाडला.
या सोहळ्यास खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सिव्हील सर्जन डॉ. सुभाष माने, उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, अधीक्षक अभियंता संजय माळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे, ग्रामपंचायत विभागाचे खातेप्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे आदी उपस्थित होते. गेल्या तीन वर्षापासून रुग्ण वाहिका खरेदी प्रक्रिया प्रलंबीत होत्या, सीईओ मनीषा आव्हाळे व इशाधिन शेळकंदे यांचे पाठपुराव्यामुळे सदर यश प्राप्त झाले असून यासाठी शासनाचा ३ कोटी पर्यंतचा निधी खर्च झाला आहे.