योगेश रणधिरे सोलापूर युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष ; साहेबांच्या हस्ते घेतले पत्र
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी नुकत्याच सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या नवीन निवडी केल्या असून त्यामध्ये काँग्रेसचे सोलापूर शहर सरचिटणीस श्रीशैल रणधिरे यांचे चिरंजीव योगेश रणधिरे यांची युवक काँग्रेस शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योगेश रणधिरे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर आरिफ शेख माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक विनोद भोसले, मनोज यलगुलवार, माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी, माजी नगरसेविका परविन इनामदार, सेवादल प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, ज्येष्ठ नेते एन के क्षीरसागर, अनिल वाघमारे, नागनाथ कदम, सिद्धाराम चाकोते, हाजी मलंग नदाफ, संजय गायकवाड, महिला शहराध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, बंटी चंदनशिवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योगेश रणधिरे दिवंगत दलित मित्र नागनाथ रणधिरे यांचे नातु आहेत. सोलापुरातील हद्दवाढ भागात रणधिरे सामाजिक कार्य करीत आहेत. मानवता विकास मंडळ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्रीशैल रणधिरे यांचे योगेश रणधिरे पुत्र आहेत. माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.