सोलापूर : चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी चंद्रशेखर पाटील, संघर्ष सेनेचे शेखर बंगाळे, करण गडदे, नागेश सदलापुरकर, महासिद्ध देवस्थानचे चेतन पुजारी, संतोष बेळे, संदीप कांबळे, चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ व पुण्यश्लोक साम्राज संघटना सोलापूर हे उपस्थित होते.
या आहेत मागण्या……
चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या जयंती / राष्ट्रीय दिन यादीमध्ये समावेश करणे, चक्रवती यशवंत महाराज होळकर यांचा स्मारक (पुर्णाकती पुतळा) सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारावा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर सुशोभिकरण निधी असतानाही गेल्या वर्षापासून मंदगतीने चालू आहे ते लवकरात लवकर सुशोभिकरणाचे काम पूर्ण करून दर्शनास खुले करावे.