वर्ल्ड ऑफ वुमन्स संस्थेने पूरग्रस्त महिलांच्या आरोग्याची घेतली अशी काळजी ; मनगोळी गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सोलापूर :- सीना नदीच्या पुरामुळे संपूर्ण संसार उघड्यावर आला. जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच पाण्याने वाहून नेले. प्रशासन आणि दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. याचाच एक भाग म्हणून वर्ल्ड ऑफ वुमन्स संघटनेचे अध्यक्ष विद्या लोलगे यांच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावात जाऊन महिलांना त्यांच्या आरोग्याच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदर्श घेऊन लोलगे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता त्यांनी महिलांना मदत करण्याचे ठरवले. पूरग्रस्ताना महिलांसाठी जसे सॅनिटरी पॅड, फिनेल, आंघोळीचा साबण, कपड्याचे साबण अशी मदत त्यांनी केली आहे. त्याबद्दल या गावातील महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले. सरपंच संजय गायकवाड यांनी संयोजन केले.
यावेळी लोलगे यांच्या सोबतीला वसंत जाधव, शोभा गायकवाड, मार्था आसादे, योजना कामतकर, शारदा मसूती, प्रिया कुलकर्णी, गीता मुळे, रेखा रूद्ररोज, तेजस्विनी मनगोळी, स्वाती मुकणार, मनीषा नलावडे हे होते.