‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !
सोलापूर शहर पोलिसांनी तडीपारीच्या दोन कारवाया केल्या आहेत. अनेक गुन्हे दाखल असलेल्या दोन युवकांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
इसम नामे, सलमान उर्फ वॉन्टेंड इरफान होटगीकर, वय ३२ वर्षे, रा. सुजाता नगर, मुळेगांव रोड, सोलापूर याचेविरुध्द सन २०१३,२०१९,२०२३ व २०२५ या कालावधीमध्ये साथीदारांसह दंगा व मारामारी करणे, घातक शस्त्राचा वापर करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
तसेच इसम नामे, अनिल उर्फ काल्या राजु चौगुले, वय-३० वर्षे, रा. मड्डी वस्ती, सोलापूर याचेविरुध्द सन २०१८ व २०२४ या कालावधीमध्ये चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.२७९६/२०२५ दि.२०/१०/२०२५ अन्वये, सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.



















