जिल्हाप्रमुख गणेश वानकर पत्रकार परिषदेत अचानक का चिडले ; असा काय होता पत्रकारांचा प्रश्न
दक्षिण सोलापूर शिवसैनिकांच्या मेळाव्या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आज जिल्हाप्रमुख गणेश वानकर अचानक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत नाही, माझे नेतृत्व मातोश्रीवर उद्धव ठाकरे हेच आहेत असं त्यांनी उभे राहून सांगितलं. त्यामुळे पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला.
पत्रकार परिषद दरम्यान मंचावर उपस्थित असलेल्यां स्थानिक नेत्यांना पत्रकारांचा प्रश्न होता. उपनेते शरद कोळी यांच्या नेतृत्वात आपण दक्षिणच्या मेळाव्यासाठी स्थानिक पदाधिकारी बर्डे, वानकर आणि खंदारे याची पक्षात उपस्थिती आहे? पण ते अबोल का? असा सवाल उपस्थित करताच गणेश वानकर यांनी आपण थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आपण मान्य केले आहे. येथील कोणाच्या नेतृत्व स्वीकारण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही अस म्हणत वानकर यांनी आक्रमक होऊन आपली भूमिका मांडली
वानकर यांची आक्रमकता पाहून, उत्तम प्रकाश खंदारे तसेच शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शरद कोळी मात्र शांतच होते तर पुरुषोत्तम बर्डे यांनी अस्मिता गायकवाड यांना तुम्ही मध्ये बोलू नका असे सांगताना दिसून आले .
आजची पत्रकार परिषद मेळाव्यासाठी आहे. तेवढेच प्रश्न विचारा असे सांगून गणेश वानकर यांनी पत्रकार परिषद थांबवण्याचा सल्लाही दिला.