दक्षिणमध्ये पावसाळी छत्र्या कोण अन् कायमच छत्र होणार कोण? सुभाष देशमुखांच्या खिल्लीने वातावरण तापले !
दक्षिण सोलापूर : राज्याचे माजी सहकार मंत्री तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची या सर्व पावसाळी छत्र्या आहेत त्यानंतर कुठे जातील सांगता येणार नाही अशी खिल्ली उडवली होती. त्या वक्तव्यानंतर आता दक्षिण मध्ये वातावरण तापले असून आता सुभाष बापूंच्या या खिल्लीनंतर प्रश्न उपस्थित होत आहेत की दक्षिण मध्ये पावसाळी छत्र्या कोण होणार आणि कायमचे छत्र कोण देणार.
लोकसभा काँग्रेस पक्षाला मिळालेल्या याच्यानंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते बाबा मिस्त्री, एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे, विजयकुमार हत्तूरे, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, बाळासाहेब शेळके, अशोक देवकते, सुदीप चाकोते यांच्यासह सुमारे 20 ते 21 जून इच्छुक असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेस पक्ष सोडला तर स्वयंम शिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील महिनाभरात दक्षिण मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे, विविध सामाजिक कार्यक्रमातून जनतेसमोर जाणारे सोमनाथ वैद्य यांचीही जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे. तसेच दक्षिण विकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून बंजारा समाजातील नेते युवराज राठोड यांनी बांधणी सुरू केली असून त्यामध्ये श्रीशैल मामा हत्तूरे, अन्नप्पा सत्तूबर हे चूक आहेत तर दुसरीकडे मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून आपली स्वतंत्र मोर्चे बांधणी करणारे संतोष पवार हे सुद्धा दक्षिणच्या मार्गावर निघाले आहेत.
भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक म्हणून डॉक्टर हवीनाळे यांचे नाव आले होते, नंतर त्यांनी सावरून घेतले. शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी उपमहापौर राजेश काळे, उदय पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. काँग्रेस पक्षाकडून धर्मराज काडादी यांचेही नाव पुढे येत आहे.
काँग्रेस पक्षाकडून दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हे प्रमुख दावेदार मानले जातात परंतु आपल्या एम के फाउंडेशनच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यातून लक्ष वेधणारे महादेव कोगणुरे यांना सुद्धा तिकीट मिळण्याची प्रचंड आशा आहे.
दक्षिण विधानसभा मतदारसंघ वाटतो तितका सोपा नाही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक इच्छुक याच मतदारसंघात झाले आहेत. सुभाष देशमुख यांच्या म्हणण्यानुसार या सर्व पावसाळी छत्र्या आहेत, सुभाष देशमुख यांनी डीवचल्याने आता या सर्वांमध्ये किती जण निवडणूक लढवतात हे पाहणं तर महत्त्वाचे ठरणार आहेत परंतु देशमुख यांच्या विरोधात उमेदवार वाढले तर त्याचा फायदा भाजपला होईल हे तितकेच खरे आहे.