


प्रभाग 25 मध्ये शिवसेनेला निवडून आणण्याचा निर्धार ; कारंडे चौगुलेंना जनतेचा प्रतिसाद
प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिवसेनेचा जोर वाढला आहे. होम टू होम प्रचार करत धनुष्यबाणाचे उमेदवार धनंजय कारंडे आणि शोभा चौगुले यांनी मतदारांशी थेट संवाद ठेवला आहे. प्रत्येक घरात त्यांचे उत्साहात स्वागत केले जात असल्याचे दिसून येते.
शुक्रवारी मजरेवाड़ी, ताकमोगे वस्ती, तात्या पार्क, कुमार नगर, नवोदय नगर अशा विविध भागामध्ये उमेदवार धनंजय रामचंद्र कारंडे व २५ क च्या उमेदवार शोभा प्रभाकर चौगुले यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढली.
यावेळी मतदारांनी धनुष्य बाणाला विजयी करण्याचा संकल्प केला. या भागात ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या असल्याने या पॅनेलला प्रतिसाद आहे.
मुस्लिम, लिंगायत, धनगर, वडार, बौद्ध समाजातून बदलाची भाषा बोलली जात असल्याने शिवसेना पर्याय आहे.




















