प्रभाग 24 मध्ये शिवसेनेचे पारडे जड ; एकटा राजेश नडतोय आमदाराला
मागील पंचवार्षिक निवडणुकीत जुळे सोलापूर वासियानी भाजपला भरभरून मतदान करून चार ही उमेदवार निवडून दिले. ज्या अपेक्षेने निवडून दिले ती मतदारांची अपेक्षा भंग झाली आहे. सद्य परिस्थितीत माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या पत्नी उषा काळे, अनुसूचित जाती मधील उमेदवार सतीश मस्के, सर्वसाधारण प्रवर्गातून विकास कदम, ओबीसी महिलेतून शिवसेना पुरस्कृत उमेदवार शैलजा राठोड यांच्या पॅनेलचे नेतृत्व राजेश काळे करत आहेत.
तसे पाहता राजेश काळे यांचे मतदारसंघात भरपूर विकास कामे केली आहेत. महात्मा बसवेश्वर उद्यानाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला होता पण विद्यमान आमदारांनी त्यात खो घातला. याचा रोष लिंगायत समाजातून व्यक्त केला जात आहे.
या प्रभागात बहुसंख्य ब्राह्मण समाज राहतो, त्या समाजाला सुद्धा उमेदवारी न दिल्याने तो समाज सुद्धा दुखावला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून ओबीसी उमेदवाराला उमेदवारी दिल्याने सर्वसाधारण गटातील मतदार सुद्धा नाराज आहेत. त्याच बरोबर या प्रभागात सुमारे चार हजार मुस्लिम मतदार असल्याने त्याचा फटका भाजपला बसणार असल्याचे बोलले जाते.
बंजारा समाजात अश्विनी चव्हाण आणि शैलजा राठोड या दोन्ही महिला उमेदवार तुल्यबळ आहेत. जुळे सोलापूर मध्ये प्रामुख्याने सिद्धू पाटील, शिवशरण पाटील, सुरेश हसापुरे, युवराज राठोड, दीपक पवार, बाळासाहेब शेळके, शहाजी पवार, देशमुख सर, अमोल जोशी ही मान्यवर मंडळी सुद्धा तटस्थ आहेत. शेवटच्या दोन ते तीन दिवसात या मान्यवरांची भूमिका निर्णायक राहणार आहे.
शिवसेनेने आपल्या प्रचारात आमदारांनी हडप केलेली आरक्षित जागा, बसवेश्वर उद्यानाला केलेला विरोध, आमदारांना त्यांच्या जागेकरीता भविष्यात महापालिकेत लागणारी गरज पाहून चार ही उमेदवार निवडून आणणे गरजेचे आहे पण माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या सारखा चाणाक्ष नेता यासर्व गोष्टी हाणून पडणार अशी जनतेतून चर्चा आहे.





















