


प्रभात 21 मध्ये भाजप बंडखोर अपक्ष उमेदवाराचा धनुष्यबाणाला पाठिंबा
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच प्रभाग क्रमांक 21 मध्ये भारतीय जनता पार्टी कडून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार ज्यांचे चिन्ह शिट्टी आहे ते राजकुमार भोसले आणि बिलकिश सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.
प्रभाग क्रमांक 21 मध्ये माजी जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडणूक लढवत आहे. या प्रभागात शिवसेनेने काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासमोर आपले आव्हान उभे केले आहे.
शिवसेनेचे उमेदवार हे स्थानिक असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे दरम्यान अपक्ष उमेदवार राजकुमार भोसले आणि बिलकिश सय्यद यांनी शिवसेना उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी शिवसेना धनुष्यबाण आणि पुरस्कृत उमेदवार चिन्ह टोपली यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजयजी कदम, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,
लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, साईनाथ अभंगराव, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे,
जिल्हाप्रमुख अमर पाटील, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शहर प्रमुख सचिन चव्हाण
महिला आघाडी जिल्हाप्रमुख मुबीना मुलानी,
युवा सेना नेते प्रियंका परांडे,यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





















