विजय मालकांच्या स्टेजवर सुभाष बापूंचे विशेष कौतुक ; सीएम देवेंद्र फडणवीस असे काय म्हणाले
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले त्यांच्या उपस्थितीत उत्तर विधानसभा मतदारसंघातील दहिटणे येथे 1348 सदनिकांचा वितरण समारंभ संपन्न झाला.
या सोहळ्याला पालकमंत्री जयकुमार गोरे, यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह महायुतीतील नेतेमंडळी उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारणारा सोलापूर पर्यटन महोत्सव 2025 च्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार सुभाष देशमुख यांचे विशेष आभार मानले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आमदार देशमुख यांनी आपल्या लोकमंगल मल्टीस्टेट मधून अडीच हजार मराठा समाजातील नागरिकांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे. राज्यांमधून तब्बल एक लाख बावन्न हजार उद्योजक उभे केले असून जवळपास 13 हजार कोटी रुपये मिळवून दिले. हे या महामंडळाचे यश असल्याचे सांगत नरेंद्र पाटील यांचेही कौतुक केले.