वंचितचे प्रकाश आंबेडकर गुरुवारी सोलापुरात ; या मैदानावर होणार सभा

सोलापूर : वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय नेते एडवोकेट प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी सोलापुरात आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत उमेदवार केले आहे. त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी सोलापुरात येत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांची शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कुंभार वेस इथल्या जय भवानी प्रशालेच्या मैदानावर दुपारी तीन वाजता सभा होणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने राहुल गायकवाड यांना अधिकृत उमेदवारी दिली होती परंतु गायकवाड यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली आणि काँग्रेसला पाठिंबा देत राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष आतिश बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे.




















