सोलापुरात मतदानावर बहिष्कार घातलेला वडार समाज गेला भाजपसोबत ; दोन विजय आले एकत्र
सोलापूर लोकसभा भाजपा,शिवसेना, राष्ट्रवादी,मनसे,रासपा,आरपीआय,रयतक्रांती, संघटना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूर शहरातील वडार समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
आमदार विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत वडार गल्ली, मड्डी वस्ती, येथे वडार समाजाची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीस संस्कृती सातपुते, माजी सभागृह नेता संजय कोळी, भाजपा नेते संजय कणके, माजी नगरसेवक विनायक विटकर, मंडल अध्यक्ष प्रथमेश आनंदकर, वडार समाजाचे सोलापूर प्रमुख शंकर चौगुले, वडार समाज पंच पाटील बाबूराव निंबाळकर, खाण संघटना अध्यक्ष लक्ष्मण विटकर, विठ्ठल आण्णा ईडागोटे, अरविंद शिंदे, गौतम भांडेकर, अरूण चौगुले, राजू चौगुले, राजू निंबाळकर, शंकर निंबाळकर उपस्थित होते.
वडार समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम भाजप प्रयत्नशील आहे, या पुढील काळातही भाजप वडार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आमदार देशमुख म्हणाले.
सत्तर वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने कायम वडार समाजाला सत्तेपासून लांब ठेवले परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणाऱ्या भारतीय जनता पार्टी व महायुती उमेदवाराच्या पाठीशी लोकसभा निवडणुकीत समाजाने खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे राज्य प्रदेश अध्यक्ष विजय चौगुले यांनी केले.
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सोलापूर शहरातील वडार समाज एक दिलाने महायुतीचे उमेदवार आ. राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी काम करेल असं आश्वासन वडार समाजाचे सोलापूर प्रमुख शंकर चौगुले यांनी यावेळी दिले.