ब्रेकिंग : सोलापूरचे चार पर्यटक अडकले उत्तराखंडमध्ये ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
उत्तराखंडमध्ये भयानक पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी तर ढगफुटी झाली आहे. यामुळे मोठं संकट कोसळलं आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे तर भयानक परिस्थिती आहे. ढगफुटी झाल्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला.
या पुराच्या पाण्याने गावाला अक्षरश: गिळंकृत केलं. अनेक कुटुंबांना या पुराच्या पाण्याने गिळंकृत केलं. या घटनेचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय सैन्याचं देखील कॅम्प या घटनेत वाहून गेल्याची माहिती आहे.
सध्या घटनास्थळी बचावाचं कार्य सुरु आहे. भारतीय सैन्याकडून युद्ध पातळीवर नागरिकांच्या बचावाचं कार्य सुरु आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रहून उत्तराखंडला गेलेल्या पर्यटकांबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे. असं असताना आता सोलापूर मधील चार पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून मिळाली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार
1) Dhiraj Bagale- 08421137765
2) Samarth Dasari – 09822110936
3) Vitthal Pujari – 08805529737
4) Malhari Dhote – 9561946450
ही चार नावे आणि त्यांचे मोबाईल नंबर आहेत.
ते चौघे ओम साई ट्रॅव्हल्स हरिद्वार मधून प्रवास करत होते त्यांच्या कुटुंबाशी त्यांचा शेवटचा संपर्क पाच ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता झाला आहे.