उत्तर तालुक्यात स्वराज्य सप्ताहातून राष्ट्रवादीची बांधणी ; उज्वला पाटील यांचे असे ही उपक्रम
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राज्यांमध्ये स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्वला पाटील यांनी उत्तर सोलापूर तालुक्यात हा स्वराज्य सप्ताह राबवताना राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार बांधणी केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी घेतलेल्या उपक्रमांमध्ये विशेष करून महिला विद्यार्थी यांच्यावर फोकस करण्यात आला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनाही त्यांनी सहभागी करून घेतल्याचे पाहायला मिळाले.
उत्तर सोलापूर गावडी दारफळ या ठिकाणी रांगोळी स्पर्धा व छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घरोघरी वाटप करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत चार क्रमांक काढण्यात आले तीन क्रमांकाला पैठणी व चौथ्या क्रमांकाला पाचशे रुपये बक्षीस देण्यात आले. उत्तर तालुका कार्याध्यक्षा राणी डोंगरे यांनी महिलांना मदतीचा हात दिला.
यमाई आश्रम शाळा मार्डी या शाळेत ओंकार कोळी यांचा वाढदिवस सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांचा सोबत साजरा करण्यात आला. शिवानंद कोळी यांचे सुपुत्र व त्यांच्या घरातील सर्वासोबत मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
स्वराज्य सप्ताह कार्यक्रमा अंतर्गत बाळे येथील ढेपे प्रशालेच्या मुलांचा व मुलींचा भरभरून प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकार सेल कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्हा खजिनदार राजेन्द्र हजारे, राज्य रोजगार समितीचे अध्यक्ष व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, विश्वकृपा प्रतिष्ठानचे दिगंबर ढेपे व ढेपे प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल ढेपे याच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, वेषभूषा स्पर्धा, व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे व गाणी हा कार्यक्रम झाला त्याला विद्यार्थ्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे उपस्थित मान्यवर भारावून गेले.