उमाकांत राठोड यांच्यानंतर बंजाराचे नेतृत्व युवराज राठोड यांच्या रूपात ; समाजात होऊ लागली चर्चा
सोलापूर : दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचे निमंत्रक युवराज राठोड हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
अनेक समाजाचा पाठिंबा त्यांना मिळत असून विशेष करून दक्षिण सोलापूर मतदारसंघातील ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.
दक्षिण सोलापूर मतदार संघात बंजारा समाजाचे सुमारे 50 तांडे आहेत. त्यामध्ये चाळीस हजार हून अधिक मतदार संख्या आहे.
परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार युवराज राठोड हे प्रचारादरम्यान घोडा तांडा येथे स्थानिकांशी चर्चा करत असताना कैलासवासी लोकनेते उमाकांत राठोड यांच्या आठवणींना उजाळा देत उमाकांत राठोड यांच्यानंतर बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे बंजारा समाजाचे दुसरे लोकनेते तुम्हीच आहात असे स्थानिकांनी युवराज भैय्या यांना संबोधले. समाजबांधवातून आलेले हे केवळ शब्द नव्हते तर एवढा ज्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची त्यांना शाबासकी आहे.
युवराज राठोड यांना बंजारा, मुस्लिम,लिंगायत, धनगर, साळी, माळी समाजातून मिळणारा प्रतिसाद तसेच ओबीसी आणि मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठी त्यांचे प्रयत्न असल्याने या निवडणुकीत या सर्व समाजाच्या जोरावर आपण निश्चित परिवर्तन घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.