उध्दव ठाकरेंच्या त्या ‘मनोरुग्ण ‘ शब्दाला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे अनेक प्रश्न ; अहो उद्धव जी…
सोलापूर : माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला असे वक्तव्य केले आहे त्या वक्तव्याला सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
कल्याणशेट्टी यांनी आपल्या ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
अहो उद्धवजी…
निलंबित सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेताना कोण मनोरुग्ण होतं?
१०० कोटींच्या वसुलीचे आदेश कोणत्या मनोरुग्णाच्या काळात निघाले?
‘ऍंटालिया’समोर स्फोटकं कोणत्या मनोरुग्णाच्या काळात सापडले?
मनसुख हिरेन या साक्षीदाराचा खून कोणत्या मनोरुग्णाच्या काळात झाला?
मराठी माणसाच्या पत्रा चाळीतल्या घरात कोणत्या मनोरुग्णाच्या संमतीने पैसे खाल्ले?
साधुंच्या हत्त्या होऊनही मूग गिळून बसणारा कोण मनोरुग्ण होता?
कोविड काळात मृतदेहांच्या बॅग्जमध्ये पैसे कोणत्या मनोरुग्णाच्या नेतृत्वात खाल्ले?
अहो उद्धवजी…
निलंबित सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेताना कोण मनोरुग्ण होतं?
१०० कोटींच्या वसुलीचे आदेश कोणत्या मनोरुग्णाच्या काळात निघाले?
'ऍंटालिया'समोर स्फोटकं कोणत्या मनोरुग्णाच्या काळात सापडले?
मनसुख हिरेन या साक्षीदाराचा खून कोणत्या मनोरुग्णाच्या काळात झाला?
मराठी… pic.twitter.com/h5FwgUgsx4
— Sachin Kalyanshetti (Modi Ka Parivar) (@Kalyanshetti_S) February 10, 2024