बदली झालेल्या त्या डॉनच्या गाण्यावर झेडपीतील चेले बेधुंद होऊन नाचले !
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली परंतु ज्या पदावर त्यांची बदली झाली होती त्या ठिकाणी ते अजूनही हजर झाले नाहीत. पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कुलकर्णी येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
अमिताभ बच्चन यांच्या डॉन चित्रपटातील मै हु डॉन या गाण्याने प्रसिद्धी मिळवलेल्या संतोष कुलकर्णी यांना झेडपीत काहीजण डॉन म्हणून संबोधतात. जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे डॉन हे गाणे बरेच गाजले होते अनेक अधिकाऱ्यांनी त्या गाण्यावर डान्स केला होता.
दरम्यानच्या काळात संतोष कुलकर्णी हे आपल्या इंद्रधनु सोसायटीतील गणेशोत्सबामध्ये दंग झाल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी आणखी एक गाणे सादर केले. अमिताभ बच्चन यांच्याच देखाना हाय रे सोचा ना या गाण्यावर अनेकजण बेधुंद होऊन नाचले. जिल्हा परिषदेमधील संतोष कुलकर्णी यांचे सहकारी वरिष्ठ सहाय्यक संजय कांबळे आणि कक्ष अधिकारी बोरुटे या दोघांनी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला.