मुस्लिम नेत्यांमध्ये एकमत होईना ! हे दोन चेहरे येऊ शकतात समोर ; मध्य मध्ये होऊ लागली फारुख शाब्दिंची चर्चा
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशातील मुस्लिम समाजाने काँग्रेसच्या इंडिया आघाडीला मतदान करून भारतीय जनता पार्टीला ४०० पार्क पासून रोखले. त्यामुळे देशात भारतीय जनता पार्टी काठावर सत्ता मिळवण्यात यशस्वी झाली.
या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनाही सोलापूरच्या मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केले. सोलापूर शहर मध्य हा काँग्रेसचा बालेकिल्ला या मतदार संघात सर्वाधिक मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत त्यामुळे काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. मध्य मधून रियाज हुंडेकरी, आरिफ शेख, फिरदोस पटेल, मैनुउद्दीन शेख, जुबेर कुरेशी, रुस्तम कंपनी, शकील मौलवी, एम डी शेख, शौकत पठाण, आसीब इकबाल, रियाज सय्यद या मुस्लिम नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागणीचा अर्ज भरला आहे.
शहर मध्ये काँग्रेसच्या विरोधात एमआयएम पक्ष असल्याने आणि काँग्रेसमध्ये मुस्लिम समाजातून इच्छुक यांची संख्या जास्त असल्याने पक्षापुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एम आय एम आणि काँग्रेस मध्ये मुस्लिम समाजाच्या मतांची विभागणी होऊन तिसऱ्याच पक्षाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. या सर्व इच्छुकांमध्ये अजूनही उमेदवारी वरून एकमत झालेले नाही.
काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने या सर्व इच्छुकांमधून एक मत होऊन एक किंवा दोन नावे पक्षाकडे पाठवून उमेदवारीसाठी जोर लावला तर निश्चित प्रयत्नांना यश येऊ शकते. काँग्रेस पक्षाकडून शहर मध्य साठी रियाज हुंडेकरी आणि महिलांमधून फिरदोस पटेल यांची नावे गेल्यास पक्ष विचार करू शकतो.
मुस्लिम नेत्यांमधील इच्छुकांची संख्या पाहता आणि या इच्छुकांमध्ये एकमत होत नसल्याने मध्यमध्ये फारूक शाब्दी यांच्या नावाची आता चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने प्रणिती शिंदे यांचा विरोधात उमेदवारी दिली नाही, समाजाच्या शब्दाचा मान ठेवून शाब्दि यांनी हे धाडस केले. याच कारणाने शाब्दि होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समाजापुढे जातील यात मात्र शंका नाही.