आमदार प्रणिती शिंदेंच्यासाठी महाविकास आघाडीची युवाशक्ती एकवटली !
सोलापूर-गेल्या पाच वर्षात सोलापूर महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता असूनही शहराचा विकास झाला नाही. आठ- आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. शहरात नवीन रस्ते केले नाहीत. हद्दवाढ भागात अनेक समस्या आहेत.या मूलभूत प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे या खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून येणे गरजेचे आहे. यासाठी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी महाविकास युवक आघाडीतील युवक अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून काँग्रेस भवन,सोलापूर येथे बैठक घेतली.
या बैठकीत युवकाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना हजारोंच्या संख्येने युवक सहभागी करणे, युवा मेळावा घेणे, डोर डू डोर प्रचार, सोशल मिडीया मजबूत करून महाविकास आघाडीने केलेले कामे पोहोचवणे अशा विविध विषयांवर महाविकास युवक आघाडीचे प्रमुख गणेश डोंगरे, अक्षय वाकसे, विठ्ठल वानकर,बालाजी चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.व आभार प्रदर्शन सुनील सारंगी यांनी केले.
या बैठकीनंतर जनवात्सल्य कार्यालया येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. महाविकास युवक आघाडीनी समन्वयक ठेवून प्रचार जोरात करून उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करा. आपल्या विजयात युवकांचा सहभाग वाढवा असेही शिंदे म्हणाले.
सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय वाकसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शहर युवा सेना प्रमुख विठ्ठल वानकर, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, लहू गायकवाड, आम आदमी पार्टीचे युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड, नितीन चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस प्रविण जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत वाडेकर, राष्ट्रवादी उत्तर युवक कॉंग्रेस अध्यक्ष वैभव विभुते, कार्याध्यक्ष सिद्घनाथ निशाणदार, संजय गायकवाड, सचिन हेगडे, शहर उत्तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे, युवक काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख सुनील सारंगी, प्रवक्ता दाऊद नदाफ, शुभम माने, शरद गुमटे, धीरज खंदारे, आकाश इंगळे पदाधिकारी उपस्थित होते.