सचिन कल्याणशेट्टी व दत्तात्रय भरणे यांचे आभार मानावे तितके कमीच ; आनंद चंदनशिवे असे का म्हणाले
सोलापूर : तब्बल 87 वर्षात अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले पण दत्तात्रय भरणे हे जिल्ह्याला पालकमंत्री लाभले आणि या भागाला सचिन कल्याणशेट्टी यांचे नेतृत्व लाभले. आणि आज वळसंग भिमनगरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श लाभलेल्या ऐतिहासिक विहिरीचे सुशोभिकरण होत आहे त्यामुळे सचिन कल्याणशेट्टी व दत्तात्रय भरणे यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत असे उद्गार माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेत काढले.
येत्या 2 मार्च रोजी वळसंग ऐतिहासिक विहीर सुशोभीकरण स्तूप व स्मारक बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रम दु.4 वाजता होणार आहे.
माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते तर आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
या ऐतिहासिक विहीर परिसर सुशोभीकरण स्तुप व स्मारक बांधकाम करण्यासाठी रक्कम रुपये 72 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोजे वळसंग भिमनगर येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 एप्रिल 1937 रोजी रेशमी धागा आणि चांदीचा ग्लास बुडवून या वळसंग ऐतिहासिक विहिरीचे उद्घाटन केले होते.