‘सांगा सिईओ’ आम्ही खायचे काय? NHM च्या हजारों कर्मचाऱ्यांचा झेडपीत ठिय्या
सोलापूर :
माहे एप्रिल आणि मे महिन्यातील मानधन न मिळाल्याने एन एच एम च्या हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेमध्ये येऊन ठिय्या आंदोलन करत लक्ष वेधले. समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर सारिका भुमकर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये जमले होते.
दरम्यान डॉ भूमकर यांनी मागील तीन महिन्यापासून मानधन मिळत नसल्याने होत असलेल्या अडचणींचा पाढा वाचताना सिईओ सर आम्ही खायचे काय अन् जगायचे कसे असा प्रश्न केला.
बायोमॅट्रीक हजेरी नुसार मानधन होणार असल्याने सदर प्रणालीचा वापर करित असताना सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांना माहे एप्रिल, मे, जुन २०२५ व याकालावधीत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. जसेच जिओ लोकशन टॅगींग नसणे, इंटरनेट सुविधांचा अभाव, फेस आर डी अॅपवरती रजिस्ट्रेशन न होणे, ओ टी.पी न येणे, आधारकार्ड अपडेट नसने, रेंज प्रोब्लॅम या कारणाने समुदाय आरोग्य अधिकारी यांना बायोमॅट्रीक प्रणाली नुसार हजेरी नोंद करताना हजेरी लागेलेली नाही. त्यामुळे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मानधन कपात न करता पूर्ण मानधन तसेच ५ महिन्याचा कामावर आधारीत रखडल मोबदला आदा करण्यात यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.