सुशीलकुमार तुमच्या-आमच्या सारखे बाजारहाट करताना भेटतात तेंव्हा…
नमस्कार,
चप्पल खरेदीचा माझा कार्यक्रम खूप दिवसांपासून रेंगाळलेला होता. मग काल ठरवून सोलापुरातील मेट्रो या दुकानात गेलोच!.. काचेचा दरवाजा ढकलून दुकानात दाखल झालो तर पुढे काय.. चक्क सुशीलकुमार शिंदे चप्पल खरेदीत दंग होते.आम्ही एकमेकांना पाहिले.. दोघांनाही तो गोड धक्का होता.अनेक महिन्यांनंतर साहेबांची भेट होत होती. माजी मुख्यमंत्री, अतिरेक्याला फासावर लटकावणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पण दुकानाबाहेर वाहनांचा ताफा नाही, सोबत कार्यकर्त्यांचा घोळका नाही.. अगदी तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य माणसासारखे बाजारहाट करायला एकटेच आलेले सुशीलकुमार! तसे भूतकाळात भजी खाण्यासाठी काय थांबवून आनंद घेतल्याचे त्यांचे किस्से अनेकांना माहीत आहेत.आज काहिसा तसाच अनुभव आला.. आस्थेवाईकपणे त्यांनी जवळ घेतले.धावत्या गप्पा झाल्या.त्यांची खरेदी झाली आणि गप्पांसाठी लवकरच भेटण्याचा वांदा करुन ते दुकानाच्या बाहेर पडले..*
*-राजा माने,*
समूह राजकीय संपादक,
फ्री प्रेस जर्नल व दैनिक नवशक्ती, मुंबई.
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.