Thursday, May 15, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

यशोगाथा ! उन्हातान्हात होणारी महिलांची थांबली पायपीट ; थेट दारात आलं नळाचं पाणी : SOLAPUR JJM

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 February 2025
in Solapur ZP
0
यशोगाथा ! उन्हातान्हात होणारी महिलांची थांबली पायपीट ; थेट दारात आलं नळाचं पाणी : SOLAPUR JJM
0
SHARES
285
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यशोगाथा ! उन्हातान्हात होणारी महिलांची थांबली पायपीट ; थेट दारात आलं नळाचं पाणी : SOLAPUR JJM

सोलापूर : पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्यामुळे लोंढेमोहितेवाडी ( ता.माळशिरस ) येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळण्यास अडचण होती पण आज जल जीवन मिशन ही योजना यशस्वीपणे मार्गी लागली आहे.त्यामुळे गावातील प्रत्येक कुटूंबाना पुरेसे व शुध्द पाणी पुरवठा होत आहे.पर्यायाने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची विशेषत: महिलांची पायपीट थांबल्याने ग्रामस्थ व महिलांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुक्यात तालुक्यापासून साधारणतः २४ कि.मी. अंतरावर सातारा जिल्हयातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या शिखर शिंगणापूर या धार्मिक ठिकाणच्या शेजारी लोंढेमोहितेवाडी हे गाव आहे.या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये निवडलेले सरपंच व ७ सदस्य तसेच सचिव ग्रामसेवक यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीचे प्रशासन चालविले जाते.या गावची लोकसंख्या १४४६ असून २४० इतकी कुटूंब संख्या असलेले एक छोटस गाव आहे.गावात निवडणूक झाल्यानंतर गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ गावातील निवडणूक, राजकारण विसरून गावामधील विकासकामे करण्यासाठी एकजूटीने एकत्र येतात हे या गावाचे विशेष आहे.

गावात पूर्वी ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी जलस्वराज्य या योजनेमधून पाणी पुरवठा योजना करण्यात आलेली होती पण ही योजना नादुरूस्त असल्यामुळे योजना पूर्णपणे बंद अवस्थेत होती.त्यामुळे गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळण्यास अडचण होती.पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना गावात व परिसरात असणा-या हातपंप व विहिरीमधून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत असे.ग्रामस्थांच्या या मुख्य अडचणींचा विचार करून लोंढेमोहितेवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अंजना विजयसिंह लोंढे, ग्रामसेवक दत्तात्रय गोरे यांनी ग्रामपंचायतीध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ यांची बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये गावच्या पिण्याच्या पाण्याची अडचण दूर कशी करायची ? याबाबत निर्णय घेऊन गावात पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार गावातील प्रत्येक कुटूंबाला पिण्यासाठी शुध्द व पुरेसा नळाद्वारे पाणी पुरवठा करणे अत्यंत गरजेचे होते म्हणून जल जीवन मिशन या योजनेमधून गावात पाणी पुरवठा योजना राबविण्याचे ठरले.त्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग माळशिरस यांच्या सहकार्याने पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव दाखल करून जिल्हा परिषद स्तरावरून जल जीवन मिशन ही योजना मंजूर करण्यात आली.या जल जीवन मिशन योजनेंतर्गत सन २०२२-२३ मध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी विहीर खोलीकरण, पंपींग मशिनरी, उर्ध्वनलिका, वितरण व्यवस्था व नळ कनेक्शन आदी कामे करण्यात आली आहेत.या पाणी पुरवठा योजनेचे काम २९ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू केल्यानंतर एका वर्षामध्ये म्हणजे २९ ऑगस्ट २०२३ रोजी काम पूर्ण करण्यात आले आहे.सदर कामांसाठी ६३ लाख ४४ हजार रुपये इतका तर नळ नोडणी या कामासाठी २ लाख ६१ हजार ६१३ रुपये इतका निधी खर्च झालेला आहे.आज या लोंढेमोहितेवाडी गावाला पाणी पुरवठा विहीरीवरून विद्युत पंपाद्वारे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरले जाते आणि टाकीमधून घरोघरी नळ जोडणी करून प्रत्येक कुटुंबांना प्रती माणसी ५५ लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा केला जातो.

आज या गावातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी त्रास सहन करावा लागला पण ग्रामस्थ व पदाधिकारी यांची एकजूट व जल जीवन मिशन या योजनेमुळे महिलांची त्रासापासून मुक्तता झाली आहे.त्यामुळे आज गावातील महिलांच्या चेह-यावर समाधान दिसून येत आहे.म्हणून गावचे सरपंच, उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ हे खूप आनंदी आहेत.आज या गावचा पिण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागााचे कार्यकारी अभियंता संजय धनशेटटी, पंचायत समिती, माळशिरस, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, माळशिरस यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य मानसिंग मोहिते, माजी सरपंच सदशिव ननवरे, माजी उपसरपंच मोहन जाधव, सुवर्णा मोहिते, उपसरपंच ज्ञानेश्वर बोधले, सदस्य विशाल सोनमळे, शितल मोहिते, उज्ज्वला पोतेकर, पुष्पा लोंढे,रुपाली ननवरे आदींचे महत्वपूर्ण असे योगदान दिले आहे.
————————————————

लोंढेमोहितेवाडी गावात पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्यामुळे गावातील महिला व ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ उडत होती पण आज जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या सहकार्यामुळे जल जीवन मिशन या योजनेची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी झाल्यामुळे सर्व ग्रामस्थांना पिण्यासाठी पुरेसे व शुध्द पाणी पुरवठा होत आहे.
– सौ.अंजना विजयसिंह लोंढे, सरपंच, लोंढेमोहितेवाडी

Tags: @SolapurZpCEO kuldeep jangamजलजीवन मिशन
SendShareTweetSend
Previous Post

यंदा प्रथमच निघणार पारंपरिक वेशभूषेत महिलांची बाईक रॅली ; असा साजरा होणार शिवजन्मोत्सव सोहळा

Next Post

अजितदादा दिवसं फिरले ! उमेश पाटील व आनंद चंदनशिवे आज कुठे अन् त्यांची काय अवस्था

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
अजितदादा दिवसं फिरले ! उमेश पाटील व आनंद चंदनशिवे आज कुठे अन् त्यांची काय अवस्था

अजितदादा दिवसं फिरले ! उमेश पाटील व आनंद चंदनशिवे आज कुठे अन् त्यांची काय अवस्था

ताज्या बातम्या

‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘

‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘

15 May 2025
ब्रेकिंग : तौफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादी दाखल ; या नेत्यांचा पुढाकार

ब्रेकिंग : तौफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादी दाखल ; या नेत्यांचा पुढाकार

13 May 2025
ब्रेकिंग ! भाजपची सोलापुरात महिलेला संधी ; रोहिणी तडवळकर शहराध्यक्ष तर शशिकांत चव्हाण जिल्हाध्यक्ष

ब्रेकिंग ! भाजपची सोलापुरात महिलेला संधी ; रोहिणी तडवळकर शहराध्यक्ष तर शशिकांत चव्हाण जिल्हाध्यक्ष

13 May 2025
दिलीप मानेच बाजार समितीचे मालक ; सुनील कळके बसले उपसभापतीच्या खुर्चीवर ; हसापुरे नेक्स्ट टाईम

दिलीप मानेच बाजार समितीचे मालक ; सुनील कळके बसले उपसभापतीच्या खुर्चीवर ; हसापुरे नेक्स्ट टाईम

11 May 2025
सोलापूरची लेक महाराष्ट्रात नंबर एक !!

सोलापूरची लेक महाराष्ट्रात नंबर एक !!

10 May 2025
सचिन कल्याणशेट्टी यांना सर्वाधिकार? ; बाजार समितीचे नूतन संचालक भेटले मुख्यमंत्र्यांना

सचिन कल्याणशेट्टी यांना सर्वाधिकार? ; बाजार समितीचे नूतन संचालक भेटले मुख्यमंत्र्यांना

9 May 2025
सोलापूर झेडपीतून शेळकंदे गेले अन् त्यांचाच विभाग झाला गायब ; नेमकी कुणाची दिशा चुकली

सोलापूर झेडपीतून शेळकंदे गेले अन् त्यांचाच विभाग झाला गायब ; नेमकी कुणाची दिशा चुकली

8 May 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

8 May 2025

क्राईम

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

by प्रशांत कटारे
5 May 2025
0

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार सोलापूरच्या एसटी स्टँड मधील रेस्ट...

सहा कोटींची फसवणूक प्रकरणात पुण्याच्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता

by प्रशांत कटारे
4 May 2025
0

जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता यातील तक्रारदारांना त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यानी...

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी

by प्रशांत कटारे
29 April 2025
0

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी सोलापूर : पत्नी सोबत राहत नसल्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1703774
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group