सुभाष देशमुख आता वाड्यावर जाऊन बसणार ; राष्ट्रवादीच्या काका साठे यांनी दिला सल्ला अन् उडवली खिल्ली
सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. हा विजय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस सह उध्दव ठाकरे शिवसेनेला उभारी देणारा ठरला आहे.
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी धोरणा विरोधी टीका केली महाराष्ट्रामध्ये भाजपला बसला असे ते म्हणाले.
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माढयाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. सोलापूरच्या मतदारांनी त्यांना भरभरून दिले आहे त्यांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांनी जनतेमध्ये मिसळून यापुढे काम करावे असा सल्ला दिला.
या विजयाने सोलापुरातील विरोधी भारतीय जनता पार्टी, अजित पवारांचा राष्ट्रवादी यांना जोरदार धक्का बसला आहे. मतदार संघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात काँग्रेसला दहा हजारापर्यंत मताधिक्य मिळाले. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सुभाष देशमुख यांना वाड्यावर जाऊन बसावे लागेल अशा शब्दात त्यांनी चिमटा काढला.