सुभाष देशमुख भेटले अन् काका साठेंचे मन बदलू लागले ! उत्तर तालुक्याच्या बैठकीत काय घडले
सोलापूर : जिल्हा परिषदेचे सदस्य पदाचे आरक्षण पडल्यापासून सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक बहुतांश चिन्ह ऐवजी आघाड्या करून लढवल्या जातील अशी शक्यता सध्या दिसत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांचा नान्नज गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने टेन्शनमध्ये आलेल्या काकांनी पर्याय म्हणून बीबीदारफळ सर्वसाधारण गटात जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सिंहासन न्यूज ने लावलेल्या बातमी पासून काका साठे यांची शेवटची निवडणूक असल्याचा भावनिक मुद्दा आता उत्तर तालुक्यात तयार होऊ लागला आहे.
पण काका साठे यांच्यासाठी बीबीदारफळ गट वाटतो तितका सोपा नाही. दोन दिवसांपूर्वी दिलीप माने आणि काका साठे एकत्र येणार अशा बातम्या लागून आल्या. त्यावेळी काका साठे यांनी सुद्धा दुजोरा दिला होता. माने साठे एकत्र येण्याच्या चर्चेने अनेक राजकीय नेत्यांना टेन्शन आल्याचे दिसून आले.
दरम्यान गुरुवारी माजी सहकार मंत्री तथा ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख हे जिल्हा परिषदेमध्ये एका बैठकीसाठी आले असता त्यांची गाडी बाहेर पडत होती. तेवढ्यात काका साठे यांची गाडी आत आली. दोघांनी एकमेकांना पाहताच दोघेही खाली उतरले. या ठिकाणी काका साठे आणि सुभाष देशमुख यांची भेट झाली. ते फोटो गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुन्हा आज शुक्रवारी काका साठे यांनी लोकमंगल बँकेत जाऊन सुभाष देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजले.
बीबीदारफळ गटातून भाजपकडून इंद्रजीत पवार हे इच्छुक आहेत. त्यांनी आपली तयारी सुद्धा सुरू केली आहे. दिलीप माने, भाजप नेते शहाजी पवार, माजी आमदार यशवंत माने, बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे हे नेते एकत्र आहेत. काका साठे यांनी सुभाष देशमुख यांची भेट झाल्यानंतर काका यांचे मन बदलण्यास सुरू झाली आहे. दिलीप माने काका साठे एकत्र येणार का? यावर हसऱ्या चेहऱ्याने तुमचे म्हणणे सत्यात उतरू असे म्हणणारे काका आता “दिलीप माने नको रे बाबा” असे म्हणू लागले आहेत त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत झालेली सुभाष देशमुख, काका साठे, सिद्धाराम म्हेत्रे यांची एकी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.
दरम्यान शुक्रवारी काका साठे यांनी उत्तर तालुक्यातील आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ही बैठक शासकीय विश्रांती ग्रहावर झाली त्या ठिकाणी उत्तर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितीचे सर्वच जागा आपल्याला लढवायच्या आहेत, कोणी इच्छुक असतील त्यांनी समोर यावे किंवा उमेदवार सुचवावेत असे आवाहन साठे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.





















