प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ कंदलगावात तुफान गर्दी ; सुरेश हसापुरेंचे नियोजन, जिल्ह्याच्या रणरागिणीला लोकसभेत पाठवा
सोलापूर : काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव मध्ये बुधवारी रात्री सभा झाली या सभेला ग्रामस्थांची तुफान गर्दी पाहायला मिळाली दक्षिणचे नेते दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या नियोजनाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांचा उसळलेला जनसागर पाहून खासदार माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी हे प्रचार सभा की विजय सभा असा आवर्जून उल्लेख केला.
“आपकी बार चारसो पार” हा नारा देत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान बदलाची भाषा करीत आहेत त्यांना देशाचा हुकूमशाह व्हायचे आहे परंतु भारताला हुकुमशहा नको तर लोकशाही हवी आहे असे सांगून बेरोजगारी संपवून रोजगार निर्मितीसाठी आणि शेतकर्यांना जीएसटीतून मुक्त करण्यासाठी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन खा. चंद्रकांत हंडोरे यांनी केले.
सुरेश हसापुरे म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून पंधरा वर्षे आमदार म्हणून काम करताना सर्वांच्या हिताची कामे केले आहेत. त्या जोरावर त्या लोकसभा निवडणूक लढवत असून सोलापूरच्या या रणरागिणीला, सोलापूरच्या या लेकीला, तुमच्या आमच्या ताईला लोकसभेत पाठवा असे आवाहन केले.
यावेळी भारत जाधव, सरपंच श्रीदिप हसापूरे, प्रथमेश पाटील, अनंत म्हेत्रे, रमेश हसापूरे, राजशेखर सगरे, सुलेमान तांबोळी, मायप्पा व्हनमाने, रावसाहेब पाटील, रमेश आसबे, शिवशंकर स्वन्ने, संजय गायकवाड, नंदकुमार अंत्रोळीकर, डाॅ. महादेव जोकारे, आनंदराव कोले, राजा कदम, संजय कोले, हणमंत सलगरे, पंपू व्हनमाने, उमाशंकर रावत, शाम व्हनमाने, अप्पाराव राऊतराव, सरपंच संगमेश बगले-पाटील, मोतीलाल राठोड यांच्यासह अन्य उपस्थित होते.