दक्षिण सोलापूर मतदारसंघात धर्मराज काडादी वीस हजार मताधिक्याने विजय होणार ; या नेत्याने बांधला अंदाज
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सर्वांचे अंदाज चुकवत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे साधारण अठरा ते वीस हजार मताधिक्याने विजयी होतील असा अंदाज काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव यांनी व्यक्त केला आहे त्यांनी तशी आकडेवारी ही समोर आणली आहे.
शहरी, हद्दवाढ भागामध्ये सुशिक्षित मतदारांनी धर्मराज काडादी यांना मतदान केल्यामुळे भाजपचे मतदान कमी होऊन धर्मराज काडादी हे निर्णय मताने निवडून येणार असल्याचा अंदाज जाधव यांनी व्यक्त केला आहे.
जाधव यांच्या मते, ग्रामीण भागामध्ये खरी फाईट ही धर्मराज काडादी, अमर पाटील व सुभाष देशमुख यांच्यामध्येच दिसून आली आहे तसेच या ग्रामीण भागामध्ये वंचित बहुजन आघाडीने दलित समाज व बंजारा समाजात बरीच मतं खेचण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे भाजप उमेदवाराची पीछेहाट होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागामध्ये धर्मराज काडादी हे एक नंबरवर अमर पाटील दोन तर सुभाष देशमुख तीन नंबरवर असं मतदान झाले आहे.
भारत जाधव पुढे म्हणाले, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदान दोन लाख 23 हजार झाले आहे. त्यानुसार अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना साधारणतः 90 हजार मतदान पडेल. त्या खालोखाल भाजपचे सुभाष देशमुख यांना 70000 मतदान पडेल. त्या खालोखाल अमर पाटील यांना 40 हजार मतदान पडेल तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार यांना दहा हजार मतदान पडेल. उर्वरित 13000 मतदान हे इतर अपक्ष उमेदवाराना मिळतील असा एकंदर अंदाज आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे 18 ते 20 हजार मतांनी विजयी होतील.