जेव्हा दिलीप माने हे विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहत होते ते जेव्हा भु. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या गौरी औदुंबर जक्कन या विद्यार्थिनीने Road Turbine हा प्रयोग केला होता, त्यामध्ये रस्त्यावरील जो गतिरोधक आहे त्यावरून जेव्हा एखादे वाहन जाते, तेव्हा त्यातून वीज निर्मिती होते, ती वीज साठवून ठेवली जाते, रात्रीच्या वेळी त्या विजेमुळे रस्त्यावरील दिवे लागतील. तो प्रकल्प माने यांना आवडला त्यांनी त्या विद्यार्थिनीला थेट “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” अशी कौतुकाची थाप दिली.
सोलापूर : ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात सोलापूर, लातूर, उस्मानाबाद व इतर जिल्ह्यातून एकूण २१० शाळांनी सहभाग नोंदविला. एकूण बाराशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती ‘मॉडेल’ तसेच ‘पोस्टर’च्या माध्यमातून सादर केल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपमाने, सचिवा जयश्री माने, उपाध्यक्ष डॉ.पृथ्वीराज माने, प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, उमेश भगत, प्राचार्य डॉ. श्रीकांत जोशी, संकुल संचालक प्रा. राहुल माने, समन्वयक प्रा.फुलारी शशिकांत., प्रा.पवन माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्राचार्य डॉ. जोशी यांनी या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना विद्यार्थ्यांची विज्ञानाबद्दल जिज्ञासूवृत्ती वृद्धिंगत होऊन समाजातील समस्या विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या द्वारे सुटू शकतात असे विशद केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने यांनी आपल्या शालेय जीवनातील विज्ञान प्रदर्शनाचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला व सध्याच्या युगात विज्ञान व तंत्रज्ञान याचे महत्त्व व विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रात्यक्षिक ज्ञान कसे महत्त्वाचे आहे ते स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या निरोपाच्या समारंभाला संस्थेच्या सचिवा सौ. जयश्रीताई माने, उपाध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने, संकुल संचालक प्रा. राहुल माने, प्राचार्य डॉ.जोशी या मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आठवी, नववी, व दहावी या गटात एकूण 51 हजार रुपयांची बक्षिसे वितरित करण्यात आली.
बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची यादी पुढील प्रमाणे आहेत.
इयत्ता आठवी मॉडेलमध्ये
प्रथम पारितोषिक -स्वप्नाली सिद्धाराम पुजारी ( कुमठे माध्यमिक प्रशाला)
द्वितीय पारितोषिक- श्लोक उल्हास सुरवसे ( कुमठे माध्यमिक प्रशाला)
तृतीय पारितोषिक- सारिका महेश शिरगुंडे ( दयानंद काशिनाथ असावा हायस्कूल करायला )
इयत्ता नववी मॉडेलमध्ये –
प्रथम क्रमांक -रहीम दस्तगीर शेख (देशमुख प्रशाला कामठी )
द्वितीय क्रमांक- प्रेम नंदकिशोर माने ( जैन गुरुकुल हायस्कूल )
तृतीय क्रमांक – खुशी सचिन माळगी ( सहस्त्रअर्जुन प्रशाला )
इयत्ता दहावी मॉडेलमध्ये
प्रथम क्रमांक – अमृता बसवराज कटबुर्गी (सिद्धेश्वर कन्या प्रशाला)
द्वितीय क्रमांक- लाड समर्थ संतोष (बालकृष्ण विद्यालय)
तृतीय क्रमांक – ज्योतीका मंडोली (राजस इंग्लिश मीडियम स्कूल)
इयत्ता आठवी पोस्टर मध्ये
प्रथम क्रमांक- श्रावणी राहुल मोरे सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल
द्वितीय क्रमांक- सृष्टी पास्ते सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल
तृतीय क्रमांक- विक्रम बाबासाहेब मोरे न्यू इंग्लिश स्कूल
इयत्ता नववी पोस्टर मध्ये
प्रथम क्रमांक – प्रज्ञा श्रीनिवास अंकम (बीटला प्रशाला)
द्वितीय क्रमांक- श्रावणी सुधीर कुलकर्णी
तृतीय क्रमांक – पोतदार वैष्णवी कालिदास
इयत्ता दहावी पोस्टर मध्ये
प्रथम क्रमांक- वेंकटेश मुरलीधर बंडा (रॉजर इंग्लिश मीडियम स्कूल)
द्वितीय क्रमांक – दिलशाद इस्माईल भगवान (एन एफ शेख हायस्कूल)
तृतीय क्रमांक- समृद्धी नेताजी काशीद ( इंग्लिश मीडियम स्कूल )
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन जाधव, तर आभार प्रदर्शन प्रा. शशिकांत फुलारी यांनी केले. तसेच प्राचार्या प्रतिभा माने, डॉ. बाबासाहेब मोरे, प्रा. घोरपडे, प्रा. इजगार, प्रा. शेख, प्रा. बिराजदार, प्रा. चडचण, प्रा. ढेपे, प्रा. सप्ताश्व, प्रा.चौधरी या तज्ज्ञ प्राध्यापकांनी परीक्षक म्हणून काम पाहिले
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. घुले, प्रा.कंदले, प्रा.सोमा, , प्रा.खंडागळे, प्रा.तुपे, प्रा.गवळी, प्रा.सोमा, प्रा.पवार, प्रा.चौगुले व प्रा.ढगारे, डॉ.भालेराव, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.