सोमनाथ वैद्य अपक्ष मैदानात ; “दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष”
सोलापूर : भारतीय जनता पार्टी कडून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य यांनी आमदार सुभाष देशमुख यांना उमेदवारी जाहीर होताच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महिन्याभरापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपमधील सहा ते सात माजी नगरसेवकांचा पाठिंबा होता. लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून त्यांना अपेक्षा होती परंतु पक्षाने विद्यमान आमदारांवर विश्वास ठेवत त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे आता “दक्षिण सोलापूरची जनता हात माझा पक्ष” म्हणून सोमनाथ वैद्य या मतदारसंघात नशीब आजमावणार आहेत.
मागील तीन महिन्यांपासून सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी लक्ष वेधून घेतले या भागातील शेतकरी महिला युवक बेरोजगार यांच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.