सोमेश वैद्य यांच्या तर्फे 11 हजार भक्तांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ ; श्रावणमासाची सुरुवात केली संगमेश्वर दर्शनाने
सोलापूर : पवित्र श्रावण मासानिमित्त स्वयंम शिक्षा फाऊंडेशनच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मंदिरात दर सोमवार आणि शनिवारी ११ हजार भक्तांना प्रसाद वाटप उपक्रमाचा शुभारंभ आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील श्री संगमेश्वर मंदिरात संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वयंम शिक्षा फाऊंडेशनच्या वतीने श्रावणमासा निमित्त दर सोमवार आणि शनिवारी पहाटे 5 ते 7 वाजेच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मंदिरात ११ हजार भक्तांना प्रसाद वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील श्री संगमेश्वर मंदिरात महापूजा आणि अभिषेक करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोमनाथ (सोमेश) वैद्य यांनी श्रावण मासानिमित्त उपस्थित भक्तांना शुभेच्छा दिल्या. या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित महिला व पुरुष भक्तांनी कौतुक केले.
या उपक्रमांतर्गत प्रसाद म्हणून शाबु खिचडी, शेंगा लाडू, राजगिरा लाडू, सेंद्रिय केळींचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित महिला भगिनींना पर्सचे वाटपही करण्यात आले.याप्रसंगी काशिनाथ भतगुणकी यांच्यासह भक्त मंडळी आणि हत्तरसंग कुडल येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर तालुक्याच्या
विकासासाठी कटिबद्ध : वैद्य
पवित्र श्रावण मासानिमित्त मोठ्या संख्येने भक्तगण उपवास करतात. यानिमित्ताने तालुक्यातील सर्व मंदिरात दर सोमवार व शनिवारी प्रसाद वाटप करण्यात येत आहे. 11 हजार भक्तांना हा प्रसाद वाटप करण्यात येत आहे असे सांगतानाच दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. स्वयंम शिक्षा फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न आहे, असे स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांनी सांगितले.
.