यंदा सोमेश्वर मलाच पावणार ! अपक्ष युवराज राठोड यांचा धुमधडाक्यात प्रचाराचा शुभारंभ
सोलापूर : दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार युवराज राठोड यांनी प्रस्थापितांना आव्हान दिले आहे.
दक्षिण मधील विविध जाती-धर्मातील नेत्यांचा राठोड यांना पाठिंबा आहे. ओबीसी आणि मागासवर्गीय समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी मैदानात उडी घेतली आहे.
या विधानसभा निवडणुकीत त्यांना बॅटरी हे चिन्ह मिळाले असून त्या बॅटरीतून त्यांचे सर्वांवर नजर आहे.
गुरुवारी हत्तुर येथील श्री सोमेश्वर देवस्थान येथून नारळ फोडून आपल्या प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ केला. यानंतर वडकबाळ सह इतर गावात घरोघरी ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेत सोबत राहण्याचे आवाहन केले.
दरम्यान माध्यमांशी बोलताना ही लढाई प्रस्थापितांविरुद्ध असून यंदा सोमेश्वर आपणालाच पावणार असा दावा करत दक्षिणच्या जनतेने मला निवडून दिले तर ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण विधानसभेत आवाज होतो असे आश्वासन त्यांनी दिले.