Sunday, March 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरकरांना नव्या वर्षात मिळाले हे गिफ्ट ; कुठे झाला आहे हा 45 किलोमीटर रिंग रोड वाचा हि महत्त्वाची बातमी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 January 2024
in solapur
0
सोलापूरकरांना नव्या वर्षात मिळाले हे गिफ्ट ; कुठे झाला आहे हा 45 किलोमीटर रिंग रोड वाचा हि महत्त्वाची बातमी
0
SHARES
8.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

(प्रतिनिधी) : सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेरून रिंग रोड अर्थात बाह्य वळणाची सतत मागणी होत होती. एकंदरीत शहराचा विकास आणि लोकांची मागणी पाहता शहराच्या बाहेरून रिंग रोडचे काम २०२२ पासून सुरू होते. ते काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूरचा रिंग रोड आता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे.

२०२४ या नवीन वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकांना हे नवं गिफ्ट मिळालं आहे. या रिंग रोडमुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक बचत देखील होणार आहे. या कॉरिडोरच्या प्रकल्पात केगाव ते हगलूर अशा ४५ किलोमीटरच्या रिंग रूटची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूरच्या हद्दीतील एकूण ५ विभाग शहराशी सहजपणे जोडण्यासाठी या रिंगरोडची निर्मिती करण्यात आली आहे.

या रिंगरोडचे काम ओजोनलँड एमईपी सोलापूर रिंग रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने कमी वेळेत उत्तमरित्या केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. या रिंग रोडमुळे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट मधील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शेतमालाच्या वाहतुकीसह दळणवळणाचे साधन ग्रामीण भागात जलद गतीने पोहोचण्यासही मोठा उपयोग होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील केगाव, देगाव, बेलाटी, कवठे, सोरेगाव, कुंभारी, दोड्डी अशी अनेक गावे सोलापूर शहराशी जोडण्यासाठी मदत होणार आहे.

सुमारे ४५ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे काम गेल्या वर्षी २० मे २०२३ रोजी कंपनीला देण्यात आले होते. ते काम ९ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले आहे. आता हा मार्ग सुरू करून नवीन वर्षाचं गिफ्ट लोकांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती ओजोनलँड
कंपनीचे मैनेजिंग डायरेक्टर अमय प्रतापसिंह म्हणाले. या प्रकल्पामध्ये २-लेन/४-लेन महामार्ग तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये पूल आणि कल्व्हर्टचे रुंदीकरण आणि पुनर्वसन, सध्याच्या महामार्गालगत चांगले फूटपाथ बांधणे इत्यादींचा समावेश आहे.

या नव्याने विकसित झालेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे केवळ लोकांची हालचाल सुधारणार नाही तर कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्य आणि समाजकल्याणासाठी चांगल्या वाहतूक व्यवस्थेद्वारे या प्रदेशाचा सर्वांगीण विकास करेल. याशिवाय या चांगल्या रस्त्यांचे जाळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षा राखण्यास मदत करेल असंही ओजोनलँड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमय प्रतापसिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, २०२४ मध्ये सोलापूरकरांना मिळालेल्या या गिफ्टमुळे सोलापूरकर देखील आनंद व्यक्त करत आहेत.

Tags: Ring roadSolapur roads
SendShareTweetSend
Previous Post

विजय मालक अभिनंदन ! सोलापूर बाजार समिती संचालकांना सहा महिने मुदतवाढ

Next Post

हगलुर ग्रामपंचायत उपसरपंचपदी झाली भडकुंबे परिवारांची प्रगती!

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
हगलुर ग्रामपंचायत उपसरपंचपदी झाली भडकुंबे परिवारांची प्रगती!

हगलुर ग्रामपंचायत उपसरपंचपदी झाली भडकुंबे परिवारांची प्रगती!

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971095
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group