सोलापूर : झोमॅटो कंपनीने (Zomato) डिलेव्हरी बॉयवर जाचक अटी आणि निमय लागू केल्या असून याविरोधात कर्मचाऱ्यांनी कंपनीचा निषेध नोंदवला आहे.
कोरोनाच्या काळात सर्वत्र संचारबंदी असताना झोमॅटो कंपनीच्या डिलेव्हरी बॉयने आपल्या जीवाचा धोका पत्करून सर्वांना घरपोच जेवण पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले त्यावेळी त्यांना कंपनीने वेतन आणि इंसेंटिव्ही दिला आता मात्र गरज सरो वैद्य मरो या उक्तीप्रमाणे झोमॅटो कंपनीने डिलेव्हरी बॉयवर जाचक अटी आणि निमय लागू केल्या आहेत नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांनी आता आपल्या कामाची वेळ कंपनीकडे नमूद करावयाची आहे त्यानंतरच त्यांना काम करता येणार आहे दरम्यान याच जाचक नियमांविरोधात कर्मचाऱ्यांनी चार पुतळा चॉकात निषेध नोंदवला यावेळी झोमॅटो कंपनीने डिलेव्हरी बॉय उपस्थित होते.


















