जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेने घेतली पालकमंत्र्यांची भेट ; जयकुमार गोरेंनी मागण्या घेतल्या ऐकून
सोलापूर : मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या विविध समस्या बाबत कास्ट्राईब संघटना सतत प्रयत्नशील असते. त्यास अनुसरून राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भेटून कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी निवेदन दिले.

जिल्हा परिषद सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदे मधील मागासवर्गीयांची सरळसेवेची रिक्त पदे भरण्यात यावीत तसेच मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या थांबलेल्या पदोन्नत्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात तसेच सर्व साधारण बदल्यांचा दिनांक 15 मे 2014 च्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात यावी, तसेच जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर पदोन्नती किंवा समायोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
याबाबत गोरे यांनी सहानुभूतीच विचार करू असे आश्वासन दिले. याप्रसंगी संघटनेचे मुख्य संघटक चंद्रकांत होळकर, कोषध्यक्ष कल्याण श्रावस्ती, रामदास गुरव, मकरंद बनसोडे, नागनाथ धोत्रे, संतोष जाधव, उमाकांत राजगुरू, चेतन भोसले आदी उपस्थित होते