सूर्यकांत भुजबळ इज बॅक अगेन ! ग्रामपंचायत डेप्युटी सीईओचा घेणार पदभार
सोलापूर : तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांची कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ओएसडी पदी बदली झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त होते. आता त्या जागेवर ग्रामविकास विभागाने धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची नियुक्ती केली आहे. भुजबळ हे बुधवारी दुपारी पदभार घेतील.
दहा वर्षानंतर भुजबळ हे पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले आहेत. 2014 ते 15 दरम्यान ते जिल्हा परिषदेमध्ये परीविक्षाधीन अधिकारी म्हणून सेवा केली. त्यानंतर 2015 मध्ये त्यांची उत्तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. या कालावधीत त्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उल्लेखनीय काम केले.
2016 मध्ये बुलढाणा जिल्ह्यात त्यांची बदली झाली. चिखली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदानंतर त्यांची बदली लातूर जिल्ह्यातील औसा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी झाली. यानंतर 2022 ते आजतागायत धाराशिव जिल्हा परिषदच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आजपर्यंत त्यांनी काम केले.