सोलापूर झेडपीचा डॉन निघाला प्रमोशनने धाराशिवला
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत डॉन या नावाची मजेदार चर्चा असते. मैं हु डॉन या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेले कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची नुकतीच बदली झाली आहे. आपल्या कामामुळे जिल्हा परिषदेत छाप पाडणारे उप कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांना पण अनेक जण डॉन म्हणूनच ओळखतात.
त्याच सुनील कटकधोंड यांचे प्रमोशन झाले असून त्यांना उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. शासनाने बुधवारी ही बदली केली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज या गावचे सुनील कटकधोंड आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी बांधकाम क्रमांक एक, बांधकाम क्रमांक, दोन ग्रामीण पाणीपुरवठा या तीनही विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिले आहे. चांगले काम करताना पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या ते कायम मर्जीत राहिल्याचे पाहायला मिळाले.
अडचणीच्या कामाची सोडवणूक आणि त्यातून मार्ग कसा काढायचा यामध्ये कटकधोंड यांची खासियत आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी सुद्धा आमसभेमध्ये त्यांच्या कामाचे कौतुक केल्याचे दिसून आले.