जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्याला वीस हजाराचे लाच घेताना अँटी करप्शनने पकडले
सोलापूर : जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी संबंधित तक्रारदार यांच्याकडून टक्केवारीप्रमाणे वीस हजार रुपयाची लाच घेताना करमाळा बांधकाम विभागाच्या प्रभारी उपअभियंत्याला अँटीकरप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे. हे कारवाई गुरुवार 27 मार्च रोजी झाली.
बबन हिरालाल गायकवाड, वय-५७ वर्षे, व्यवसाय-नोकरी, पद-शाखा अभियंता, प्रभारी उप अभियंता, नेमणुक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, करमाळा असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे सुपरवाझर म्हणुन काम करत असलेले कॉन्ट्रॅक्टर यांना जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक २ अंतर्गत १) वांगी नं. २ ते इझिमा १२ रस्ता सुधारणा करणे, २) वरकुटे ते साडे रस्ता सुधारणा करणे, ३) वीट चोपडे वस्ती ते झरे रस्ता सुधारणा करणे या कामांची ई-निविदाद्वारे वर्क ऑर्डर मिळालेली असुन, सदर कामाची सर्व जबाबदारी पार पाडुन बिलाच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी सुपरवाझर या नात्याने यातील तक्रारदार यांचेवर आहे.
त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता सदर कामापैकी वांगी नं.२ ते इझीमा १२ रस्ता सुधारणा या कामाचे प्राथमिक बिल ५.८७,८६१/-रु. तक्रारदार यांना प्राप्त झाले असुन, सदर बिल काढण्याचा मोबदला तसेच उर्वरित दोन कामाचे प्राथमिक बिल काढण्याकरीता म्हणुन यातील लोकसेवक बबन गायकवाड यांनी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रु. लाचेची मागणी करुन, तडजोडअंती २०,०००/-रु. लाच रक्कम आजरोजी पंचासमक्ष मागणी करुन २०,०००/-रु. लाच रक्कम स्वतः स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर प्रकरणी करमाळा पोलीस स्टेशन
येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.