सोलापूर झेडपीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ; सारे वातावरण भगवेमय





स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, उप शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, कार्यकारी अभियंता पार्सेकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना भगवे फेटे बांधण्यात आले होते, त्यामुळे याठिकाणी वातावरण भगवेमय झाले होते.