महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा सेवेत घ्या
सोलापूर – सोलापूर महानगरपालिका तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पलोलू हे कोरोना महामारी सुरु होण्या पुर्वीचे वैद्यकीय अधिकारी असून त्यांनी कोरोना काळात तिन्ही लाटेत काम करून ही त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील चुकीचे व असंबधीत कारणाने त्यांच्या वर अन्यायकारक कारवाई झाली.
या प्रकरणाची सर्व चौकशी पूर्ण झाली असून ते निर्दोष आहेत व सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे उच्चतम अधिकारी यांचे अभिप्राय व अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु यांचे कामकाज नियमानुसार झाल्याचे प्राप्त झाले आहे.
डॉ. पल्लोलु यांना म.न.पा आरोग्य विभाग मध्ये पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय सेलचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रा. राहुल बोळकोटे यांच्या वतीने सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी पालकमंत्र्यांनी या विषयी निश्चित चौकशी करून न्याय देण्यात येईल व सेवेत सामावण्याचे आदेश देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात सुर्यकांत शिवशरण, व्ही. डी. गायकवाड, बळीराम एडके, प्रमोद भवाळ उपस्थित होते.