सोलापूरच्या पूरग्रस्तांना कोल्हापूरकरांनी दिला मदतीचा हात ; किसनभाऊंनी घरोघरी जाऊन दिले किट
सोलापूर – सोलापूर शहर व जिल्ह्याील अनेक तालुक्यांना पावसानं झोडपलं आहे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे या पावसामुळे नुकसान झाला आहे विशेषतः उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, माढा, करमाळा, मोहोळ या भागात पावसानं थैमान घातला होता. तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पूर सदृश्य परिस्थिती आहे जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे यासोबत शेतात पाणी शिरल्याने पिकांची हानी झाली आहे इतिहासात प्रथमच सिना नदीला पूर आल्यामुळे शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नदीकाठी असलेल्या उसासह केळी सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे अनेकांचे घर या अतिवृष्टीमुळे उघड्यावर आला असून शेतकरी हा आर्थिक कचाट्यात सापडला आहे या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून आता कोल्हापूरकरांनी पुढाकार दाखवला असून महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमांतून सोलापुरातील अतिवृष्टीग्रस्त बांधवांसाठी अन्नधान्य किट वाटप करण्यात आले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या रेल्वे लाईन येथील संपर्क कार्यालय येथे बुधवारी कोल्हापूरहून आलेल्या अन्नधान्य किट गाड्यांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदिल फरास, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप भैया माने, सुहास जांभळे, इचलकरंजी अध्यक्ष अमित गाताडे, उमेश भोईटे, विकास पाटील, प्रवीण भोसले सरकार, दत्ता पाटील, मखतुम नाईकवाडी, कैफ शेख, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, उमेश जाधव, तुषार शिवाजी गायकवाड, अजिंक्य शिंदे, शुभम हत्तुरे, सचिन विलास जाधव होटगीकर, फिरोज पठाण, माणिक कांबळे, वसंत कांबळे, आनंद गाडेकर, ओमकार धोत्रे, अजयकुमार कांती, जितेश भोसले श्रीकांत जाधव यांच्या उपस्थितीत कोल्हापूरहून आलेल्या गाड्यांचे पूजन किसन जाधव यांच्या हस्ते करून हे गाड्या दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त बांधवांना अन्नधान्य किट घेऊन आलेल्या गाड्या रवाना झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्फत सोलापूरकरांच्या पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून ५१ लाख रुपयांचा अन्नधान्य किट सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी वाटपचा उद्दिष्ट आहे पहिला टप्पा म्हणून आज उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त बांधवांना या अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदिल फरास यांनी यावेळी सांगितले. दरम्यान सोलापुरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचे संपर्क देखील तुटला आहे शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांना कोल्हापूरकरांचा एक मदतीचा हात म्हणून सामाजिक बांधिलकी जपत नामदार हसन मुश्रीफ यांच्या वतीने सोलापुरातील पूरग्रस्त बांधवांसाठी पहिला टप्पा म्हणून ९०० अन्नधान्य किट वाटपाचे शुभारंभ करण्यात आले.
महायुती सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना समाधानकारक आर्थिक मदत मिळणार आहे संवेदनशील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अतिवृष्टी भागांची पाहणी केली आहे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल या दृष्टीने ते प्रयत्नशील आहेत असेही यावेळी किसन जाधव म्हणाले. अतिवृष्टीग्रस्त बंधू-भगिनींसाठी दिलासा आपुलकीचा सामाजिक बांधिलकीचा मदतीचा हात देऊन कोल्हापूरकरांनी सोलापूरकरांच्या संकटावर मात केली आहे नामदार हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरकरांचे आभार देखील यावेळी किसन जाधव यांनी मानले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या संकट काळात पाठीशी खंबीर उभा राहिलं अशी आशा देखील यावेळी किसन जाधव यांनी व्यक्त केलं.