सोलापूर : सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठात पाच नंदीध्वजांचे सोमवारी एकत्रित पूजन करण्यात आले. मठाधिपती श्रो. ब्र. श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते यांचे पूजन झाले. प्रारंभी पाचही नंदीध्वजांना परंपरेप्रमाणे पुष्पहारांची सजावट करण्यात आली. यानंतर बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली पूजन झाले.
त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी, श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, सोमनाथ मेंगाणे, सुधीर थोबडे, संदेश भोगडे, संजय दर्गोपाटील, राजशेखर चडचणकर, गुरुद्वाराचे प्रमुख रमेश सिंग, रविंदर सिंग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, विजयकुमार देशपांडे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वसेकर, एम. के. फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे,
सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी नगरसेवक श्रीनिवास पुरुड, गणेश चिंचोळी, सचिन शिवशक्ती, ॲड. संतोष होसमनी, ॲड. रमेश मणुरे, कन्नड साहित्य परिषदेचे सोमेश्वर जमशेट्टी आदी उपस्थित होते.
कुलगुरूंनी प्रथमच घेतला सहभाग
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सोलापूरची वैभवशाली परंपरा असलेल्या नंदीध्वज पूजनात प्रथमच सहभाग घेतला. प्र. कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांना श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा इतिहास आणि नंदीध्वज पूजनाबद्दल माहिती दिली.