सोलापूर शिवजयंतीतील मंडळे पालकमंत्र्यांच्या ‘ओएसडी’कडे ; या वर्षी सांभाळून घ्या, आमचे पैसे अडकले आहेत
सोलापूर : सोलापुरात यंदाची शिवजयंती ही डॉल्बीमुक्त साजरी करण्याचा संकल्प शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी सर्व मंडळांना आवाहन देखील करण्यात आले होते. दरम्यान झालेल्या पोलीस आयुक्तांच्या शांतता कमिटीच्या बैठकीत आयुक्त राजकुमार यांनी यंदाची शिवजयंती ही डॉल्बीमुक्त साजरी करण्यासाठीही आवाहन केले, नियमांचे भंग झाले तर त्यांच्यावर कारवाई होईल असा सज्जड दम त्यांनी भरला.
नुकत्याच झालेल्या माता रमाई जयंतीच्या मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे त्या 24 मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
बुधवारी जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी पालकमंत्र्यांचे ओएसडी बाळासाहेब यादव यांच्यासमोर सुमारे 100 युवकांची गर्दी दिसून आली. ही नेमकी गर्दी कशाची होती हे जेव्हा माहिती घेतली असता हे युवक यादव यांना भेटण्यासाठी आले होते हे सर्व शिवजन्मोत्सव विविध मंडळाचे पदाधिकारी होते. त्यांनी यादव यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडली.
बऱ्याच मंडळांनी डॉल्बीवाल्यांना ॲडव्हान्स पैसे दिले आहेत आता ते परत कसे मिळतील. यावर्षी सांभाळून घ्या, पुढील वर्षीपासून सोलापूर डॉल्बीमुक्तीचा संकल्प करू, सोलापुरात गणेश उत्सव मिरवणूक तसेच शक्ती देवीच्या मिरवणुका या डॉल्बीमुक्त असतात, पारंपारिक खेळाचे दर्शन होते त्यामुळे यावेळी आमचे पैसे अडकले आहेत. पुढील वर्षीपासून डॉल्बी न लावण्याचा निर्धार या मंडळाच्या युवकांनी बोलून दाखवला. यावेळी बाळासाहेब यादव यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी याप्रकरणी बोलून चर्चा करू असे आश्वासन दिले.